Friday , November 6 2026
Breaking News

कोल्हापूर येथील अत्याचार व खून प्रकरणी नराधम मामाला बेड्या

Spread the love

 

कोल्हापूर : दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधम मामा दिनेशकुमार केशनाथ साह (25, सध्या रा. दत्तनगर शिये, मूळ बिहार) याला रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. करवीर तालुक्यातील शिये येथे बालिकेवर अत्याचार करून नराधमाने पीडितेचा गळा घोटून जीव घेतल्याने संतप्त पडसाद उमटत आहेत.

मुलीचा शोध सुरू असतानाच मामाची कामावर हजेरी
अचानक बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध सुरू असतानाच सायंकाळी तिचा मामा कामावर गेला. शेजारी राहणारे निर्मला पाटील, विलास पाटील, वंदना पाटील, आप्पासाहेब शिंदे, कांतिसिंह पाटील, सौरभ पाटील यांनी रात्री दहापर्यंत शियेसह परिसर पालथा घालत असला तरीही मुलीचा मामाने गांभीर्य दाखवले नसल्याने संशय बळावला.  या संशयाने मामास अटक केली.

About Belgaum Varta

Check Also

महालक्ष्मी मंदिरातील कामे वेगाने पूर्ण करा – जिल्हाधिकारी

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील कामे तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *