Tuesday , September 17 2024
Breaking News

वडगाव-यरमाळ रस्त्यावर बसफेऱ्या वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

Spread the love

 

बेळगाव : वडगावपासून बळ्ळारी नाला अलिकडे व वडगाव पलिकडे शहापूर, वडगाव, धामणे, येळ्ळूर, मासगौंडहट्टी अशी हजारो एकर कृषी जमीन आहे. वडगाव, शहापूर शिवारातील शेतजमीन हि शहरी भागातील शेतकऱ्यांची आहे. तिथे बारमाही शेतकरी व महिला शेतीत जात असतात. कारण बळ्ळारी नाल्यापूढे जवळपास 800/850 एकर यरमाळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला शहापूर शिवार आहे. आधी शेतकरी बैलगाडी घेऊन जाताना त्यातून महिलाही जायच्या. पण बैलगाड्या कमी झाल्याने शहापूर, वडगाव भागातील अनेक महिला चालत जाऊन आपली शेतीची कामं करतात. खरिप हंगामात महिलांचीच जास्त कामं आसतात. पावसाळ्यात तर दोन तीनवेळा भांगलण करावी लागल्याने गटागटाने चालतजात असतानां दिसतात. जर रिक्षाने जायच म्हटल्यास जातायेता प्रत्येकी 40/50 रु लागतात. अतिवृष्टीने पीकं गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आले असलेतरी हा खर्च करावाच लागतो. तरच शेती स्वच्छ असते. त्यात सरकारची मदत म्हणजे धन्यास कण्या, चोरास मलिदा. खऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायची सोडून भलत्यालाच भरपाई मिळाल्याने अनेक शेतकरी सरकारला दुषण देत असतात. तेंव्हा सरकारने बांधावर येऊन शेतकऱ्यांना भरपाई दिल्यास त्यांना समाधान वाटत थोडा भांगलणीचा खर्चतरी भागवता येईल. कारण या महागाईत शेतकऱ्यांना शेती करणच जिकेरीच होऊन बसलय. अनेकांनी तर पीक कर्ज घेऊन पेरलेली भातपीकं गेल्याने शेतीत पुन्हा भात लावणी केली त्यासाठी दुसरा भुर्दंड. त्यासाठी संबंधित बस डेपो अधिकाऱ्यांनी वडगाव -यरमाळ रस्त्यावर मासगौंड हट्टीची जनता व विद्यार्थी वर्गासाठी त्यांच्या विनंतीनुसार सकाळी व संध्याकाळी बस सोडली आहे. तशीच सकाळी 10.30 ते 11 वाजता, दुपारी 2 वाजता व संध्याकाळी 6 ते 6.30 ला अशा बसफेऱ्या वाढवून शेतकऱ्यांचा खर्च कमी करावा अशी सरकार तसेच संबंधित परिवहन खात्याकडे शेतकरी व महिला वर्गाची मागणीसह विनंती आहे. अन्यथा येत्या काळात शेतकरी व महिला संबंधित परिवहन खात्याच्या कार्यालयावर शहापूर, वडगाव व इतर भागातील शेतकरी व महिला मोर्चाने येऊन निवेदन देण्याची तयार करत आहेत. तेंव्हा परिवहन खात्याने शेतकऱ्यांप्रती आत्मियता दाखवत वडगाव-यरमाळ रस्त्यावर बसफेऱ्या वाढवून दिलासा द्यावा अशी बेळगाव तालूका रयत संघटना तसेच परिसरातील शेतकरी महिलातर्फे अगत्याची मागणी आहे.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *