Monday , September 21 2026
Breaking News

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत श्रीपेवाडीचा पारितोष पाटील प्रथम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील माजी विद्यार्थी सोमशेखर कानडे यांनी आपल्या आई भारती अनिल कानडे यांच्या स्मरणार्थ नूतन मराठी शाळेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूल मधील विद्यार्थी पारितोष पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. अध्यक्षस्थानी हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. एम. बाचने व व्यंकटेश्वरा पदवीपूर्व कॉलेजचे उपप्राचार्य एम. डी. खोत उपस्थित होते.
स्पर्धेत प्राची अजित मोहिते (न्यू इंग्लिश स्कूल, रेंदाळ), समर्थ संजय खाडे (जी. एम. संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ऐश्वर्या अशोक माने (अक्कमहादेवी गर्ल्स हायस्कूल, संकेश्वर), सिफा फैजूला कमते (नूतन मराठी विद्यालय निपाणी) यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.
परीक्षक म्हणून पी. पी. पाटील, एस. पी. जगदाळे, व्ही. एम. बाचणे यांनी काम पाहिले. कार्यक्रमास एस. आर. संकपाळ, एस. एस. कुलकर्णी पाटील, व्ही. बी. पाटील, एस. आय. किवंडा उपस्थित होते. एस. बी.पवार यांनी सूत्रसंचालन केले. आर. एस. चव्हाण यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *