बेळगाव : गणेशोत्सव निमित्त महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील रस्त्याची डागडुजी करत आहे ती अत्यंत चुकीच्या प्रकारे कंत्राटदार करत आहेत. रविवारी रात्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकाऱ्यांनी पाहणी करताना ही बाब निदर्शनास आली असुन कंत्राटदारांना याचा जाब विचारला.
शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केलेल्या मागणीनुसार महापालिकेकडून शहरातील खड्डे पडून खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी केली जात आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे बुजवून केल्या जाणाऱ्या पॅचवर्कच्या कामासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काँक्रीट वापरले जात असल्याने संबंधित भागातील कार्यकर्ते व गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी संताप व्यक्त होत आहे.
याची दखल घेत लोकमान्य टिळक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, सुनील जाधव, रवी कलघटगी, नितीन जाधव व अरुण पाटील यांनी काल रविवारी रात्री दुचाकीवरून शहरातील रस्त्यांचा पाहणी दौरा केला.