बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनांमृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त सोमवारी श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
पहाटे 4.30 वा. मंगल आरती, त्यानंतर दर्शन आरती, भगवंताच्या जन्माबाबतची पार्श्वभूमी सांगणारे परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन सकाळच्या सत्रात झाले. त्यानंतर दिवसभरात भजन कीर्तन आधी कार्यक्रम झाले.
दुपारनंतर वैष्णवांचे आणि देणगीदारांचे अभिषेक झाले. त्यानंतर नाट्यलिला आणि श्रीकृष्ण जन्माची कथा स्वामी महाराजांनी सांगितली. रात्री 12 वा. श्रीकृष्ण जन्म सोहळा पार पडला. दिवसभरात हजारो भक्तांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले आणि कार्यक्रमात सहभागी झाले.रात्री सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पाऊस असूनही भाविकांनी भक्तानी उपस्थित राहून लाभ घेतला.
27 रोजी श्रील प्रभूपाद यांचा जन्मदिन
जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी इस्कॉनचे संस्थापक आचार्य प.पू.श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस असल्याने तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्त मंगळवारी मंदिरात सकाळी दहा वाजता श्रील प्रभुपाद गौरव, साडेअकरा वाजता अभिषेक, साडेबारा वाजता पुष्पांजली व गुरुवंदना आदि कार्यक्रम होणार असून प्रभुपाद यांच्या जीवनावर अनेक भक्त आपले विचार व्यक्त करतील त्यानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन व दुपारी सर्वांसाठी महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कृष्ण भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन बेळगावतर्फे करण्यात आले आहे