Thursday , April 23 2026
Breaking News

मोस्ट वाँटेड कैद्याची हिंडलगा कारागृहात रवानगी

Spread the love

 

बेळगाव : कोट्यवधी रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून फोन करून धमकी देणाऱ्या मोस्ट वाँटेड कैद्याला सोमवारी रात्री नागपुरहून विमानाने बेळगावला आणण्यात आले.
अकबर पाशा या मोस्ट वाँटेड कैद्याला नागपुर बेळगाव या विमानाने बेळगावात आणण्यात आले. अकबर पाशाचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. नुकतेच बेळगाव न्यायालयाच्या आवारात जयेश पुजारी या कैद्याने पाक समर्थक घोषणा देत हिंडलगा कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून २०० कोटींची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अकबर पाशा आणि जयेश पुजारी यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. नागपूर पोलिसांनी जयेश पुजारीला काही दिवसांपूर्वी हिंडलगा येथे पाठवले होते. आता अतिरेकी अकबर पाशा याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून विमानाने बेळगावात आणून कडक पोलीस बंदोबस्तात हिंडलगा कारागृहात पाठवण्यात आले. बंगळुरू येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्फोट प्रकरणात अकबर पाशा सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *