Wednesday , March 4 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगीत स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न

Spread the love

 

एम्. व्ही. हेरवाडकर स्कूलची प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय राष्ट्रीय समूहगीत स्पर्धा संत मीरा विद्यालयाच्या माधव सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश व लोक अदालतचे चेअरमन अजित सोलापूरकर तसेच दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण समारंभाला समाजसेवक व आनंद ॲडव्हर्टायझिंगचे संचालक अनंत लाड उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अक्षता मोरे यांच्या संपूर्ण वंदे मातरम् गायनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी मुख्य अतिथिंची ओळख करून दिली. डॉ. जे. जी. नाईक यांनी भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय प्रकल्पांची तसेच कार्याची विस्तृत माहिती दिली. योगिता हिरेमठ व सुखद देशपांडे यांनी परीक्षकांची ओळख करून दिली. रजनी गुर्जर यांनी स्पर्धेचे नियम व अटी समजावून दिल्या.
मुख्य अतिथी निवृत्त जिल्हा न्यायाधीश अजित सोलापूरकर यांनी उपस्थितांना राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि विविध कायद्यांविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच परिषदेच्या राष्ट्रीय कार्याला शुभेच्छा दिल्या. दुपारच्या सत्रात खास पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित असलेले समाजसेवक अनंत लाड यांनी आपले विचार प्रकट करत उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांचा यावेळी खास सत्कार करण्यात आला. परीक्षक संगीत विद्वान अरुंधती सुखटणकर, मंजुश्री खोत व लक्ष्मी तिगडी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत हिंदी विभागात प्रथम क्रमांक एम्. व्ही. हेरवाडकर स्कूल, द्वितीय क्रमांक के. एल. एस. स्कूल आणि तृतीय क्रमांक बालिका आदर्श विद्यालयाने मिळविला. विशेष पारितोषिक अमृता विद्यालय, भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल व संत मीरा हायस्कूल यांना देण्यात आले. तर लोकगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक एम्. व्ही. हेरवाडकर स्कूल, द्वितीय क्रमांक बालिका आदर्श विद्यालय आणि तृतीय क्रमांक गोगटे महाविद्यालयने मिळविला. एम. आर. भंडारी स्कूल व मुक्तांगण विद्यालय यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. हिंदी विभाग प्रथम क्रमांक विजेत्या एम्. व्ही. हेरवाडकर स्कूलची सप्टेंबरमध्ये गंगावती येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन ज्योती प्रभू व अक्षता मोरे यांनी केले. रजनी गुर्जर, योगिता हिरेमठ व सुखद देशपांडे यांनी कार्यक्रम संयोजन केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी, नामजी देशपांडे, सुभाष मिराशी, श्रीनिवास शिवणगी, कॅप्टन प्राणेश कुलकर्णी, डी. वाय. पाटील, रामचंद्र तिगडी, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, चंद्रशेखर इटी, कुमार पाटील, पी. एम. घाडी, विजय हिडदुग्गी, जया नायक, विद्या इटी, पूजा पाटील, प्रिया पाटील, ज्योत्स्ना गिलबिले, भारत विकास परिषदेचे सर्व सदस्य, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *