
बेळगाव : ओमानमध्ये कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गोकाक येथील आई, मुलगा, मुलगी आणि जावई या चार जणांचा मृत्यू झाला.
गोकाक येथील विजया मायाप्पा तहसीलदार (52), पवनकुमार मायाप्पा तहसीलदार (22), पूजा आदिशा उप्पार (21) आणि अदिशे बसवराज उप्पार (32) यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मूळचे गोकाकचे रहिवासी असून नोकरीनिमित्त ओमानमध्ये स्थायिक झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री 10 वाजता ओमानहून कतारला जात असताना त्यांच्या इलेक्ट्रिक कारचे नियंत्रण सुटले आणि ती एका लॉरीला धडकली. त्यामुळे इलेक्ट्रिक कारचा चक्काचूर होऊन कार पूर्णपणे जळून खाक होऊन चार जणांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच राज्यसभा इराणा कडाडी यांनी मृतदेह भारतात आणण्याकरिता प्रयत्न सुरू केले असून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि प्रल्हाद जोशी यांनाही त्यांनी आवाहन केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta