बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात 68 कोटी 10 लाख रुपयांच्या ठेवी जमविल्या असून 62 कोटी 80 लाखाची कर्ज वितरित केली आहेत व 22.80 कोटींची गुंतवणूक केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला 61 लाख 36 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे” अशी माहिती सोसायटीचे चेअरमन श्री. संजय मोरे यांनी बोलताना दिली. सोसायटीची 24 वी वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच संस्थेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागताने झाली. त्यानंतर गेल्या वर्षभरात निधन पावलेल्या संस्थेच्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील वर्षीच्या सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून दाखवल्यानंतर अहवाल वाचन मुख्य शाखा व्यवस्थापक विराज भातकांडे यांनी केले. 2023-24 च्या नफा विभागणीस त्यानंतर अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली तसेच 2024 -25 चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. यावर्षी सभासदांना 12% लाभांश जाहीर करण्यात आला. नंतर सभासदानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन संजय मोरे यांनी दिली. या वर्षात रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली. स्पर्धात्मक युगात उत्तम कार्य केल्याबद्दल संचालक व कर्मचारी यांचे कौतुक करणारी भाषणे पुंडलिक कुंडेकर, जयाताई मोडक व अन्य सभासदांनी केली.
आभार प्रदर्शन नेहरू नगर शाखेच्या व्यवस्थापिका माधुरी खटावकर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश ओझा, संचालक प्रसन्ना रेवन्नवर, किशोर भोसले, राजेंद्र अडुरकर, जयपाल ठकाई, शारदा सावंत, सदाशिव कोळी, सविता कणबरकर, मयूर सुळगेकर यांच्यासह व्यवस्थापक अन्नपूर्णा पाटील, देवाप्पा पाटील, गोपालसिंग रजपूत, विनोद तिगडोळी आणि कर्मचारी उपस्थित होते.