बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल एम. व्ही. हिरेमठ यांचा बेळगावात जंगम समाजातर्फे सत्कार करण्यात आला. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. त्यानिमित्त शहरातील कुमारस्वामी लेआऊटमधील रॉयल गार्डनमध्ये शुक्रवारी सायंकाळी बेळगाव जंगम समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांच्याहस्ते हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले, सरकारी सेवेत सुप्रशासन कसे द्यावे हे एम. व्ही. हिरेमठ यांच्याकडून शिकले पाहिजे. सरकारी सेवेचा गर्व न बाळगता लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. फळाची अपेक्षा न करता त्यांनी चांगले कार्य करून दाखविले आहे. त्यांनी या पुरस्कारासाठी अर्जही केला नव्हता. पण सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्राण केला आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. यावेळी चंद्रशेखरय्या सवदी, जी. एस. पाटील, एम. जे. शिवकुमार, वीरुपाक्षय्या निलगीमठ, शोभा होसमठ आदी उपस्थित होते.
Check Also
बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू
Spread the love बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे …