बेळगाव : कोरे गल्ली शहापूर यांच्या वतीने गणेश उत्सव निमित्त आरती संग्रह प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, महादेव पाटील, नेताजी जाधव, कोरे गल्लीचे पंच सोमनाथ कुंडेकर, राजकुमार बोकडे, शिवाजी हावळानाचे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री. मरगाळे यांनी गणेश उत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, विसर्जन मिरवणूक युवकांनी हुल्लडबाजी न करता पारंपरिक पद्धतीने साजरी करावी अशी माहिती दिली. त्याचबरोबर महादेव पाटील यांनी मूर्तीची उंची योग्य ती ठेवावी. त्यामुळे मिरवणूक वेळेत पार पडेल याबद्द्ल माहिती दिली. यावेळी कोरे गल्लीचे पंच शांताराम गावडोजी, सागर हावळानाचे, शांताराम मजुकर, शिवाजी केरवाडकर, गजानन सावंत, कल्लापा हंडे, सन्मित्र महिला मंडळ प्रतिनिधी जयश्री शहापूरकर, रश्मी मोहिते, निता कुंडेकर, सरिता पाटील, स्मिता उचगावकर त्याचबरोबर गल्लीतील समितीचे कार्यकर्ते गजानन शहापूरकर, अरुण कडोलकर, सुनील बोकडे, राजाराम मजुकर, मनोहर शहापूरकर, अभिजीत मजुकर, नागेश शिंदे, राजू गावडोजी, रवी जाधव, शिवाजी उचगावकर, अनंत पाटील, परशुराम शिंदोळकर, नागेश कुंडेकर आदी उपस्थित होते.