बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील ममदापूर गावात रात्री भजनाचा कार्यक्रम सुरू असताना एका व्यक्तीचा ऊस तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.
ममदापूर गावातील बीर सिद्धेश्वर मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर गच्चीवर झोपलेल्या मद्देप्पा यल्लाप्पा बनासी (४७) यांच्यावर त्याच गावात राहणाऱ्या बीराप्पा सिद्दप्पा सुंदोळी याने कोयत्याने वार केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मद्देप्पाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मैदानाच्या जागेवरून मद्देप्पा आणि बीरप्पा यांच्यात भांडण झाले होते आणि गोकाक ग्रामीण ठाण्यात बीरप्पावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.