बेळगाव : नदी क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी गेलेल्या बेळगाव येथील कमांडो सेंटरच्या दोन कमांडोचा बोट उलटल्याने मृत्यू झाला. काल सकाळी बेळगाव येथील कमांडो प्रशिक्षण विभागाच्या जवानांना नदी क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी तिलारी धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरात आणण्यात आले होते.
दरम्यान नदी क्रॉसिंग प्रशिक्षण सुरु असताना बोट उलटली यामध्ये बेळगाव येथील जेएल विंग कमांडो ट्रेनिंग सेंटरमधील 28 वर्षीय विजयकुमार रा. राजस्थान आणि 26 वर्षीय दिवाकर रा. पश्चिम बंगाल यांचा मृत्यू झाला. बोटीतून नदी पार करणाऱ्या सहा जवानांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण सुखरूप आहेत.
चंदगड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta