Tuesday , March 3 2026
Breaking News

रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे सन्मानपूर्वक बसवली!

Spread the love

 

 

बेळगाव : तब्बल दीड वर्षांनी बेळगाव मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे सन्मानपूर्वक बसवण्यात आल्याने शिवप्रेमी आणि भीमप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर अनेक महापुरुषांची शिल्पे बसविण्यात आली. मात्र जाणीवपूर्वक याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे बसविण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. याविरोधात श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आणि दलित समाज संघटनांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते. वारंवार रेल्वे विभागाला अल्टिमेटम देण्यात आला होता. अखेर या आंदोलनाला यश आले असून दोन्ही महापुरुषांची शिल्पे रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी बसविण्यात आली आहेत.
यासंदर्भात बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेस्थानकावर छत्र. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिल्पे बसविण्यात यावीत यासाठी आम्ही आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून समस्त शिवप्रेमी आणि भीमप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांची शिल्पे रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटर विभागाच्या वरील बाजूस बसविण्यात आली असून दलित संघटनांच्या आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या आंदोलनाला यश आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *