Sunday , July 26 2026
Breaking News

गौरी निर्माल्य संकलनाची ८ वर्षे

Spread the love

 

दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनाचा उपक्रम

निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन करण्याच्या समाजिक भावनेतून येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक आणि टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष सयोजीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम सलग ८ वर्षे राबविला आहे. यंदा गुरूवारी (ता.१२) घरगुती गणेश मूर्ती व गौरी विसर्जनाच्या वेळी फाउंडेशनतर्फे निर्माल्यासह मूर्ती दानाचे आवाहनही करण्यात आले आहे.
दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून निकु पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निर्माल्य संकलन करून पर्यावरण व पाणी प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. शहर व उपनातील सर्वच भाविकांना गणेश विसर्जनासाठी मंडळातर्फे सर्व सोय केली आहे. तर गौरीच्या निर्माल्य संकलनासाठी स्वतःचे ट्रॅक्टर उपलब्ध करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत घरगुती गणेश मूर्ती विसर्जन व गौरी निर्माल्यासाठी स्वतंत्र काहील व प्रकाशाची व्यवस्था केली आहे. यावेळी नगरपालिका आणि पोलिस प्रशासनासह फाउंडेशन पदाधिकाऱ्यांसह रमेश भोईटे, रणजीत मगदूम, वसंत धारव, पुंडलिक कुंभार, नारायण यादव, सागर पाटील व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे निकु पाटील यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *