बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श जी जी चिटणीस, कॅन्टोन्मेंट, संत मीरा सेंट झेवियर्स शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्राथमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात कॅन्टोन्मेंट स्कूलने गोमटेश शाळेचा 3-1 असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात जी जी चिटणीस शाळेने लिटल स्कॉलरचा पराभव करीत अंतिम करीत प्रवेश केला.
मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने गोमटेश शाळेचा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बालिका आदर्शने भरतेश शाळेचा पराभव केला,
माध्यमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने भरतेश शाळेचा पराभव केला, तर उत्तर विभाग संघ मैदानात गैरहजर राहिल्याने संत मीरा शाळेला पुढे चाल देण्यात आली, तर माध्यमिक मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने भरतेश शाळेचा पराभव केला तर बालिका आदर्श संघाला प्रतिस्पर्धी संघ नआल्याने पुढे चाल देण्यात आली व संघानी अंतिम प्रवेश केला.
तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन बेळगाव शहराचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आय. डी. हिरेमठ संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, जी जी चिटणीस शाळेच्या मुख्याध्यापिका नवीन शेट्टीगार, बालिका आदर्शचे मुख्याध्यापक एन. ओ. डोंणकरी, मंजुनाथ गोलीहाळ्ळी, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, बापू देसाई, नागराज भगवंतण्णावर, जयसिंग धनाजी, चंद्रकांत पाटील, चेस्टर रोझारियो, उमेश बेळगुंदकर, देवेंद्र कुडची, मयुरी पिंगट, या मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षक मानस नाईक, यश पाटील, शिवकुमार सुतार, हणमंत अडोनी, मारुती मगदूमसह विविध शाळेचे क्रीडाशिक्षक सहशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम दरम्यान टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्यावतीने शहराचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आय. डी. हिरेमठ, प्रशिक्षक मानस नायक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा मेंलिनीमनी तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.