बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. प्रतिक्षा प्रकाश कदम (ढोलगरवाडी-चंदगड) हिची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल बिजगर्णी येथे तिचा सत्कार करण्यात येणार आहे
कु. प्रतिक्षा हिने बी.एससी. पदवी कोल्हापूर स्वामी विवेकानंद महाविद्यालयत पूर्ण केली. तिचं स्वप्न होतं की पोलिस उपनिरीक्षक होण्याचं. त्यासाठी सातत्याने अभ्यास करून, व्यायाम करत एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा देऊन महाराष्ट्र राज्यात मुलींमध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कठीण अशा स्पर्धांतून यशस्वी झाली आहे. महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये घवघवीत यश संपादन करुन जिद्द चिकाटीने ध्येय गाठता येते हे तिनं दाखवून दिले आहे.
या तिच्या उज्ज्वल कामगिरीबद्दल इतरांनी आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षा द्यावी. यासाठी विशेष सत्कार उद्या दि. १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ब्रम्हलिंग मंदिरात आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वसंत अष्टेकर, के. आर. भास्कर यांनी केले आहे.