बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श, जी जी चिटणीस, संत मीरा शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात जी जी चिटणीस शाळेने कॅन्टोन्मेंट स्कूलनचा 4-3 पराभव केला. विजयी संघाच्या कृष्णा गौडाडकरने 2 गोल, साईश कदम, आकाश पाठक यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात सामन्यात बालिका आदर्शने शाळेने गोमटेश शाळेचा 9-0 पराभव केला, विजयी संघाच्या सेजल धामणेकर, आदिती कोरे यांनी प्रत्येकी 3 गोल, श्रेया मजूकरने 2 गोल, श्रेया खन्नूरकरने 1 गोल केला.
माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 4-0 असा पराभव केला, विजयी संघाच्या सोहेल बिजापूरने 3 गोल, तर श्रेयस किल्लेकरने 1 गोल केला.
तर मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात बालिका आदर्श शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 3-2 असा पराभव केला. विजयी संघाच्या वैष्णवी नावगेकरने 2 गोल, ऋतुजा सुतारने एक गोल केला. वरील विजेते संघ आगामी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक, मंजुनाथ गोलीहाळ्ळी, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, बापू देसाई, नागराज भगवंतण्णावर, जयसिंग धनाजी, चंद्रकांत पाटील, चेस्टर रोझारियो, उमेश बेळगुंदकर, देवेंद्र कुडची, मयुरी पिंगट, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रशिक्षक मानस नाईक, यश पाटील, शिवकुमार सुतार, हणमंत अडोनी, मारुती मगदूम उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta