बेळगाव : बेळगावातील रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये काल रात्री ईद मिलाद मिरवणुकीनंतर क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर तलवारी घेऊन हाणामारीत झाले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, ईद मिलादची मिरवणूक सुरू असताना रुक्मिणीनगर आणि उज्वल नगर येथील काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. पण मिरवणूक आटोपून परतत असताना दोन्ही गटात तलवारीने हाणामारी झाली. या घटनेत उज्वल नगर येथील चार जणांच्या मानेला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली असून मोहम्मद कैफ, साहिल बंडारे, तन्वीर, अहमद अशी जखमींची नावे आहेत. सध्या जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी माळ मारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.