बेळगाव : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने दुर्गवीर प्रतिष्ठान बेळगाव-चंदगड विभाग व श्री दुर्गसेवा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव किल्ला स्वच्छता मोहीम फत्ते झाली.
गडावरील श्री दुर्गा माता मंदिरात नवरात्री उत्सव मिलिटरी मार्फत मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याचीच पूर्वतयारी म्हणून मुख्य प्रवेशद्वार, बुरुज आणि लगतची तटबंदी वरील अतिप्रमाणात वाढलेली झाडेंझुडूपे काढून टाकण्यात आली. दुर्गवीरांनी हार्णेस आणि रोप वापरून तटबंदीवरील धोकादायक झुडूपे काढून गडाची सेवा केली.
पुढे होणाऱ्या मोहिमेत गडाची संपूर्ण तटबंदी स्वच्छ करण्याचा मानस दोन्ही संस्थानी घेतला असून बेळगाव-चंदगड मधील शिवभक्तांनी सामील होण्याचे आवाहन करण्यात आले.