Sunday , July 26 2026
Breaking News

माध्यमिक शिक्षक पतसंस्थेला ६.३४ लाखाचा नफा

Spread the love

 

लक्ष्मण चिंगळे; ९.७५ टक्के लाभांश जाहीर

निपाणी (वार्ता) : संस्थेचे भागभांडवल २९ लाख ३० हजार, राखीव व इतर निधी ४८ लाख ९६ हजार, ठेवी ९० लाख ९७ हजार, कर्जे ७६.७३ लाख, खेळते भांडवल १ कोटी ६९ लाख, वार्षिक उलाढाल ४ कोटी ८० लाख होऊन ६ लाख ३४ हजाराचा नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना ९.७५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी दिली. येथील माध्यमिक शाळा नोकर व निवृत नोकर सहकारी संस्थेच्या २८ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे सभासद पुंडलीक माने होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन झाले. संस्थेचे अध्यक्ष आर. जी. शिंदे यांनी स्वागत केले.
संस्थेचे सेक्रेटरी प्रताप जाधव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. बुडा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण चिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त शिक्षक पी. वाय. माने, मंगल कुलकर्णी, सुवर्णा येरूडकर, शालन सुतार, अमोल आवटे, सोमाप्पा कोरी यांचा सत्कार झाला.
सभेस संस्थेचे अध्यक्ष एस. डी. ठाणे, संचालक के. बी. झुपरे, एस. एस. आडके, आर. एस. भायनाईक, बी. डी. शिरोळे, एल. बी. बिरादार पाटील, बी. आर. कोळेकर, एम. ए. जमदाडे, एल. एस. रजपुत, एस. बी. गोरे, एस. जी. कोथळे यांच्यासह सभासद, कर्मचारी उपस्थित होते. एल. बी. बिरादार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जे. एन. चव्हाण यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *