Sunday , July 26 2026
Breaking News

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या मिथुन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या १७ व्या सोहळ्यात ८ ऑक्टोबर रोजी अभिनेते मिथुन चक्रवर्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत मिथुन चक्रवर्ती यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विविध पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. तसंच तीन चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आता चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार या पुरस्काराने मिथुन चक्रवर्ती यांना गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा जारी केली आहे. मिठुनदा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो! दादासाहेब फाळके निवड ज्युरीने दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती जी भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महान योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
स्वामी विवेकानंद चित्रपटात केलं रामकृष्ण परमहंस यांचे काम
मिथुन चक्रवर्तींनी ‘स्वामी विवेकानंद’ या १९९८ मध्ये आलेल्या चित्रपटात रामकृष्ण परमहंस ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तसंच आत्तापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मणिरत्नम दिग्दर्शित गुरु या चित्रपटात त्यांनी साकरलेलं माणिकदास गुप्ता हे पात्र रामनाथ गोयंका यांच्या आयुष्यावर आधारित होतं. या भूमिकेचंही खूप कौतुक झालं. आता चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. भारतीय चित्रपट सृष्टीची वाढ आणि विकासासाठी अपवादात्मक आणि उत्कृष्ट योगदानासाठी चित्रपट व्यवसायातील उत्तम कलाकारांना सुवर्णकमळ व १० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *