Sunday , July 26 2026
Breaking News

विद्या आधार योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत

Spread the love

 

बेळगाव : रद्दीतून बुद्धी या आशयांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विद्या आधार या योजनेच्या माध्यमातून आज जीआयटी महाविद्यालयातील एका गरजू विद्यार्थ्याला आर्थिक सहकार्य करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्याहस्ते विद्यार्थ्याला १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. विद्या आधार योजना ही जुन्या कचऱ्यातून जमा झालेल्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याची योजना आहे. त्यामुळे विद्या आधार योजनेअंतर्गत गरजूंना विद्यार्थ्यांना मदत व्हावी, यासाठी जुनी पुस्तके आणि वर्तमानपत्रे दान करावीत, असे आवाहन करण्यात आले. जुन्या रद्दीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून विद्या आधार योजना हाती घेतली जाते त्यामुळे सहकार्याचे आवाहन करण्यात आले. विनायक बोंगाळे, गंगाधर पाटील, कोमल शिरसाठ, विद्यार्थी, पालक आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *