बेळगाव : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल चलवेनहट्टी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मनोहर हुंदरे यांनी अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सरकार तसेच मराठी साहित्यिकांच्या वतीने अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते पण ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा केली आणि संपुर्ण महाराष्ट्रसह सिमाभागाला आनंद झाला आहे. दोन ते अडीज हजार वर्षांपूर्वीची जुनी असलेल्या आपल्या माय मराठीला अभिजात दर्जा मिळालाने आम्ही आनंदी झालो आहे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि मिठाई वाटून हा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बाबू पाटील, भुषण पाटील, कनोज बडवानाचे, मोहन पाटील, नितेश नाथबुवा, अमृत रेडेकर, सचिन पाटील, ओमकार पाटील, प्रकाश बडवानाचे, परशराम रेडेकर, सिद्राय बडवानाचे, लक्ष्मण निंगोजी बडवानाचे, मनोज पाटील, सुशांत पाटील, किरण पाटील, शेश्रेय पाटील आदी उपस्थित होते.