Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर केंद्रातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर केंद्राच्यावतीने आयोजित केंद्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बी. आर.सी. प्रमुख डॉ. एम्. एस्. मेदार, केंद्र प्रमुख महेश जळगेकर, मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक आर्. एम्. चलवादी, येळ्ळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक एम.बी. पाटील, कन्नड येळ्ळूरवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अळणावर, समिती शाळेच्या मुख्याध्यापिका एस्. व्ही. सांबरेकर, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका मनियार, सुळगा शाळेच्या मुख्याध्यापिका नाईक आणि राजहंसगडचे मुख्याध्यापक गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मॉडेल स्कूलच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीतेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख महेश जळकेकर यांनी केले. त्यानंतर शासनामार्फत आणि वेगवेगळ्या संघ संस्थेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार केलेल्या आदर्श शिक्षिका सौ. शोभा निलजकर, श्रीमती कडबी, श्रीमती मंगल मंडोळकर, सौ. मेघा देसाई, सौ.सुमन बाळेकुंद्री आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच केंद्रामध्ये नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. एम. एस. मेदार यांनी शिक्षकांना एफ.एल.एन्. बद्दल मार्गदर्शन केले. या पुरस्काराच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या कार्याची पोच पावती मिळते असे त्यांनी सांगितले. श्रीमती कडबी आणि श्रीमती मंडोळकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस. बी. पाखरे यांनी केले, तर एम. एल. हंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास येळ्ळूर केंद्रातील शिक्षक, निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *