Sunday , December 7 2025
Breaking News

भर पावसात श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित आठव्या दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात ध. संभाजी महाराज चौक येथून झाली. यावेळी ध. संभाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यांनतर ध्वज चढविण्यात आला. नंतर प्रेरणा मंत्र म्हणून भर पावसात दौडीला प्रारंभ झाला. त्यानंतर ही दौड बसवान गल्ली, गणपती गल्ली, कडोलकर गल्ली, भातकांडे गल्ली, पांगुळ गल्ली, तेंगिंकेरा गल्ली, कामत गल्ली, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कॉलेज रोड करून बापट गल्ली मार्गे संयुक्त महारष्ट्रा चौक येथे पोहचली. यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. बाजीप्रभू देशपांडे यांनी जशी पावनखिंड लढवली आणि महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचून स्वराज्य वाचवले तशीच काहीशी आजची दुर्गा माता दौड मुसळधार पावसात आपण सर्वांनी मोठ्या निष्ठेने आज पूर्ण केली. आपले खूप कौतुक आहे. दुर्गामाता दौडीतून शिवाजी महाराजांचा विचार याच पद्धतीने आपण घ्यायचा आहे. त्यांनतर देशातील नामवंत उद्योगपती श्री. रतनजी टाटा यांचे दुःखद निधन झाले यानिमित्त त्यांना मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मारुतीरायाची आरती करून ध्येय मंत्र म्हणून प्रमुख पाहुणे प्रसाद मेडिकल मॉलचे संचालक सी. के. पाटील तसेच सीपीआय दिलीप निंबाळकर व माजी महापौर रेणूताई किल्लेकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला. भर पावसातही अनेकांनी गल्लोगल्ली उत्स्फूर्तपणे स्वागत केले होते. विशेष म्हणजे बाळ गोपाळ आणि महिला वर्ग यांनीही पावसात दौड पूर्ण केली. जिजाबाई आणि बाल शिवाजी असा उत्कृष्ट देखावा यावेळी सादर करण्यात आला.
तसेच शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी श्री दुर्गामाता दौडीच्या सांगता समारोपाच्या दिवशी जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह. भ. प. शिरीष मोरे महाराज देहूकर यांचे मार्गदर्शनपर जाहीर व्याख्यान श्री शंभूतीर्थ, धर्मवीर संभाजी महाराज येथे ठेवण्यात आले आहे तरी सर्व शिवभक्तांनी आणि वारकरी संप्रदायांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा.

About Belgaum Varta

Check Also

धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने 8 डिसेंबर 2025 रोजी महामेळाव्याचे आयोजन केले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *