बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सौंदत्ती येथील रेणुका देवीचे दर्शन घेतले. जमीन घोटाळा प्रकरणी सिद्धरामय्या अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी आज रविवारी रेणुका देवीचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी त्यांनी रेणुका देवी देवस्थान परिसरात विविध विकासकामांचे उद्घाटनही केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि गेस्ट हाऊस सौंदत्ती येथे उद्घाटन केले. रु. २२.४५ कोटी रुपये खर्चून व्यावसायिक इमारत आणि आणि १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या गेस्ट हाऊसचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार, मंत्री सतीश जारकीहोळी, एच. के. पाटील, रामलिंगा रेड्डी, लक्ष्मी हेब्बाळकर, आ. विश्वास वैद्य, राजू कागे, बाबासाहेब पटेल, आसिफ (राजू) सेठ , विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते.