बेळगाव : केबल टेक्निशियन असल्याचे सांगून घरात शिरलेल्या एका भामट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. ढोर गल्ली वडगाव येथे बुधवारी दुपारी ३.४२ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान हा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
सदर भामटा घरात शिरला त्यावेळी त्या घरात फक्त दोन वृद्ध महिला होत्या. त्यापैकी एका वृद्ध महिलेला त्या भामट्याने तुमची टीव्हीची केबल तपासायची आहे असे सांगून पहिल्या मजल्यावर नेले. वृद्धापकाळामुळे नीट चालताही येत नसलेली ती महिला कशीबशी त्या भामट्यासोबत पहिल्या मजल्यावर गेली. तेथे येताच या भामट्याने महिलेला बेसावध ठेवत तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तेथून पळ काढला. सदर प्रकार घडताच त्या महिलेने आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत तो भामटा घरातून प्रसार झाला होता.
Belgaum Varta Belgaum Varta