Wednesday , March 4 2026
Breaking News

बैलहोंगल येथे युवकाची भीषण हत्या!

Spread the love

 

बेळगाव : तेरा जणांच्या टोळक्याने बियरच्या बाटल्या आणि विळ्याचा वापर करून एका युवकाची भीषण हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्या असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रवी थिम्मन्नवर (23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बैलहोंगल येथील शाळेच्या मैदानात 13 जणांनी एकत्र येऊन बिअरची बाटली व विळ्याने वार करून या तरुणाची हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. बैलहोंगल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *