बेळगाव : सौंदत्ती येथील हर्षा साखर कारखान्याच्या यंदाच्या ऊस तोडणी हंगामाला श्री उमेश्वर शिवाचार्य स्वामींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
सौंदत्ती साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 2023-2024 हंगामात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या 11 प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कारखान्याच्या अध्यक्ष आणि महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कारखान्याला शेतकऱ्यांच्या सहकार्याने यावर्षीही चांगले उत्पादन मिळेल, असा विश्वास व्यक्त करत हंगामाच्या सुरुवातीला सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी गिरीजा हट्टीहोळी, भारती कल्लूर, बबन्ना कल्लूर, कारखान्याचे महाव्यवस्थापक सदाशिव थोरव, ऊस विभागाचे महाव्यवस्थापक एन. एम. पाटील, इथेनॉल युनिट मॅनेजर सांबरेकर, कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी चौकीमठ, तसेच कारखान्याच्या सर्व विभागांचे कर्मचारी, बैलहोंगल, सौंदत्ती, कित्तूर आणि धारवाड येथील शेतकरी नेते, शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta