Tuesday , December 16 2025
Breaking News

ममता चिठ्ठीचे मरणोत्तर देहदान

Spread the love

 

जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार

बेळगाव : मूळच्या येळ्ळूर आणि सध्या समृद्धी कॉलनी येथील रहिवासी ममता चिठ्ठी हिचे रविवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. निधन समयी त्या ३१ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या निधनानंतर डॉ. संपत पाटील यांनी जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला व देहदानाविषयी कल्पना दिली त्यानंतर बामणे यांनी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाशी संपर्क साधला आणि देहदानाचे सोपस्कार पूर्ण केले.
तिच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
परशराम चिठ्ठी कुटुंबीयांच्या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार असून जायंट्स आय फौंडेशन आणि जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *