Wednesday , November 13 2024
Breaking News

बेळगाव ते पंढरपूर स्पेशल ट्रेन

Spread the love

 

बेळगाव : कार्तिक एकादशी निमित्त दिनांक 9 नोव्हेंबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी पंढरपूर येथील विशेष रेल्वे बेळगाव मार्गे पंढरपूरला सोडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण – पश्चिम रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे, असे बेळगाव लोकसभा खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले.

प्रस्तावित कालावधीत, ही गाडी (ट्रेन क्र. ०७३१३) हुबळी येथून सायंकाळी ७:४५ वाजता सुटेल आणि बेळगावला रात्री १०:०५ वाजता पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३० वाजता पंढरपूरला पोहोचेल.
त्यानुसार ही गाडी (ट्रेन क्र. ०७३१४) पंढरपूरहून सकाळी ६ वाजता सुटते आणि बेळगावला दुपारी १:१० वाजता पोहोचते आणि त्यानंतर सायंकाळी ४:३० वाजता हुबळीला पोहोचेल.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगावचे खासदार श्री. जगदीश शेट्टर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

चलवेनहट्टी येथे होणार स्वागत कमानीचे उद्घाटन

Spread the loveबेळगाव : चलवेनहट्टी येथे आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने गावच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान‌ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *