बेळगाव : जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी रायबागचे आप्पासाहेब कुलघोडे तर उपाध्यक्ष पदाची सुभाष ढवळेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी संचालकांची मोर्चेबांधणी सुरू होती. शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये पालकमंत्री सतीश जारकहोळी यांच्या नेतृत्वाखाली भालचंद्र जारकीहोळी व माजी अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. नजीकच्या काळात बँकेच्या राजकारणात मोठा बदल झाला होता. संचालक मंडळाच्या नाराजीमुळे रमेश कत्ती यांना बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ नेत्यांना आणि संचालकांना विश्वासात घेऊन बैठक घेऊन आप्पासाहेब कुलघोडे यांची पुढील अडीच वर्षांसाठी एकमताने निवड करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta