बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये कार्तिक उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या कार्तिकोत्सवाचे यंदाचे 65 वे वर्ष असून रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कार्तिक उत्सव पार पडणार आहे.
त्यानिमित्त सकाळी 8 वाजता होम हवन, 9 वाजता लघुरुद्राभिषेक, 11 वाजता सत्यनारायण पूजा, 12 वाजता महाआरती करण्यात येणार आहे. तर सायंकाळी सात वाजता कार्तिकोत्सव पार पडणार आहे त्यानंतर आठ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी बेळगावसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta