Saturday , June 6 2026
Breaking News

येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या रोहित आर. पाटील यांना शुभेच्छा

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024, तासगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटाचे) अधिकृत उमेदवार मा. स्व. आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव सीमावासीयांच्या निकट असणारे रोहित आर. आर. पाटील यांची आज तासगाव येथे असणाऱ्या जाहीर सभेमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधी आणि येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या वतीने शुभेच्छा पर भेट घेण्यात आली. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध चर्चा करताना सीमावासियांचे निकटवर्ती रोहित आर. पाटील यांनी निवडून आल्यानंतर सीमाभागातील मराठी भाषिकांवर गेली कित्येक वर्षे होत असलेला हा अन्याय दूर करण्यासाठी जातीने लक्ष घालून प्रलंबित सीमा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंतीही यावेळी करण्यात आली. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधी तसेच येळ्ळूर विभाग म. ए. समितीच्या वतीने ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, तसेच येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, परशराम परीट, रमेश मेनसे, लक्ष्मण छत्र्यानावर, वासू सामजी, महेश यळगूकर आणि इतर म. ए. समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *