बेळगाव : सांबरा विमानतळाजवळ सोमवारी पहाटे एका युवकाची क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
मृताच्या खिशात दुचाकीची किल्ली सापडल्याने, पोलिसांच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. सोमवारी पहाटे बेळगाव जिल्ह्यातील सांबरा विमानतळाच्या कडेच्या शेतात एका युवकाचा मृतदेह सापडला. या युवकाचे डोक्यावर दगडाने हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मरिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा घटनेचा भाग आहे. मृतकाचे नाव आणि ओळख अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. शेतकऱ्यांनी मृतदेह पाहून घाबरून पोलिसांना माहिती दिली, आणि त्वरित घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले. बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. घटनास्थळी सापडलेल्या वाहनाच्या किल्ल्यांवर आधारित पोलिसांनी तपास सुरु केला असून निर्जन स्थळी झालेल्या या प्रकारच्या मागे असलेल्या कारणाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta