Wednesday , March 4 2026
Breaking News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्यावतीने महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्यावतीने नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने 21 नोव्हेंबर 2024 रोजी नंदादीप रुग्णालय परिसर टिळकवाडी बेळगाव येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आनंद तुप्पड, पीआरओ नंदादीप हॉस्पिटल यांनी रोटरी सदस्यांचे स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आरटीएनचे अध्यक्ष डॉ. रुपाली जनाज यांनी स्वागत केले. डॉ. ज्योत्सना पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले की, नियमित नेत्रतपासणी प्रत्येकासाठी का महत्त्वाची आहे आणि डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ. श्रुती रेवणकर, प्रशासक श्री. इरय्या मस्तमरादी, संचालन व्यवस्थापक श्री. अनिरुद्ध सूर्यवंशी, पीआरओ श्री. आनंद तुप्पुड, आरसीबी दर्पण सचिव आरटीएन शीतल चिलामी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरटीएन राजश्री उपपिन आणि आरसीबी दर्पणचे सर्व सदस्य उपस्थित होते.

एमओसी आरटीएन कावेरी करूर यांनी केले आणि कार्यक्रम अतिशय सुरळीतपणे हाताळला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *