Tuesday , March 3 2026
Breaking News

संजीवीनी फौंडेशनमध्ये ११११ दिव्यांची आरास करून साजरा केला दीपोत्सव

Spread the love

 

बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये आज दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आज फौंडेशन परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या.

सायंकाळी सहा वाजता श्री परमज्योति अम्माभगवानांच्या पादुकांचा पुष्पाभिषेक करून महाआरती करण्यात आली त्यानंतर दीपोत्सव कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसर ११११ दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाला होता. यावेळी उपस्थित संचालक मंडळ कर्मचारी आणि आज्जीआजोबांनी दिवे पेटवून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
यावेळी सीईओ मदन बामणे, संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, रेखा बामणे, विद्या सरनोबत व संजय पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *