बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या 68 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभाग घेणाऱ्या संपूर्ण मुलींच्या फुटबॉल संघाला उद्दमबाग येथील वेगा हेल्मेट असोसिएटच्यावतीने फुटबॉल किट, स्पोर्ट्स बॅग, व फुटबॉल गणवेश देऊन त्यांचा वेगा हेल्मेट असोसिशएटच्यावतीने व्यवस्थापक जुबेर मुल्ला, शिवानंद बिडी यांनी सत्कार केला व संघाला शुभेच्छा दिल्या. संघाला दिलेल्या क्रीडा किट दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन केले व सहकार्याबद्दल आभार मानले. जम्मू काश्मीर येथे 6 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा 17 वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करणार आहे, या संघात कर्णधार चैत्राली इमोजी, उपकर्णधार दिपा बिडी, अंजली चौगुले, ऐश्वर्या शहापुरमठ, भावना कौजलगी, श्रद्धा लक्कण्णावर, जिया बाचीकर, सान्वी पाटील, चरण्या मंजुनाथ, सृष्टी बोंगाळे, मोनिता रेंग, अमृता मोलशोय, दीपिका रेंग, संस्कृती भंडारी, कृतिका लोहार, सर्व संत मीरा बेळगाव, हर्षिता विकास, भवरवित मान, हरलीनकौर सिंधू तिघेही मानसा हायस्कूल पंजाब यांचा संघात समावेश आहे. या संघासमवेत प्रशिक्षक शिवकुमार सुतार संघ व्यवस्थापक चंद्रकांत तुर्केवाडी, श्रद्धा मेंडके, आदिती कुलकर्णी, यांचा समावेश आहे. या संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष व विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.