बेळगाव : हनुमान नगर हिंदवाडी येथील प्रज्वल बसवराज महांतशेट्टी (वय 24) हा युवक काल पासून बेपत्ता आहे. घरातून वॉकिंगसाठी जाणार असल्याचे या युवकाने सांगितले होते. परंतु अद्याप सदर युवक घरी परतला नसल्याने त्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. प्रज्वल हा विनया महाविद्यालयात डी फार्मसी शिकत आहे. प्रज्वल हा मानसिकदृष्ट्या थोडा कमकुवत असल्याने त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडे उपचार देखील सुरू आहेत. काल सायंकाळी वॉकिंगसाठी गेलेला प्रज्वल अद्यापही परत आला नाही. गोरा रंग, गोल चेहरा, लांब नाक आणि मजबूत शरीरयष्टी असे त्याचे वर्णन आहे. घरातून बाहेर पडताना हिरव्या आणि ब्राऊन पट्यांचा टी-शर्ट तसेच राखाडी रंगाची शॉर्ट प्रज्वलने परिधान केली आहे. कन्नड, हिंदी आणि इंग्लिश भाषा तो बोलू शकतो. त्याच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित टिळकवाडी पोलीस स्थानकात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta