बेळगाव : माहेश्वरी युवा संघ बेळगांव व ‘ऑपरेशन मदत’ यांनी संयुक्तपणे मोहीम राबवुन खानापूर तालुक्यातील कणकुंबी परिसरातील दुर्गम चिगुळे गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यांनींना शैक्षणिक साहित्य आणि मोठ्या रगचे (ब्लॅंकेट) वाटप केले.
‘ऑपरेशन मदत’ तर्फे खानापूर तालुक्यातील जंगलातील दुर्गम खेड्यापाड्यावरील मुलांमुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ उपक्रमा अंतर्गत माहेश्वरी युवा संघाच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चीगुळे गावातील गरजू मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य तसेच ब्लँकेटचे वितरण करण्यात आले.
हा उपक्रम राबविण्यात मधुसूदन भंडारी, गौतम चिंडक, राहुल मुंदडा, कार्तिक शहा, व्हिक्टर फ्रान्सिस, प्रशांत बिर्जे, विकी मेहता, प्रसाद हुली यांचे विशेष सहकार्य लाभल्याची माहिती राहुल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी खास बेळगांवहुन आलेल्या मास्टर दिव्या शहा याने सर्व मुला-मुलींना चाॅकलेटचे वाटप केले. यावेळी चिगुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर उपक्रमांतर्गत ‘ऑपरेशन मदत’ च्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta