बेळगाव : कर्नाटक बॉडी बिल्डींग असोसिएशनतर्फे “मिस्टर कर्नाटक श्री” शरीरसौष्ठव स्पर्धेत मि. कर्नाटक श्री 2 धीरज कुमार उडुपी याने निर्विवादपणे विजेतेपद पटकाविले. उपविजेता चरण कुंदर उडुपी, बेस्ट पोझर झाकीर हुल्लुर धारवाड यांनी संपादन केले. शनिवार 8 डिसेंबर रोजी दावणगिरी येथील मोती वीराप्पा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे आणि दावणगिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या आणि प्रत्येक गटातील पाच क्रमांक विजेत्यांना आकर्षक चषक व रोरव बक्षीस घेऊन गौरवण्यात आले.
विजेत्या शरीरसौष्ठवपटूला रोख रुपये ३० हजार, उपविजेत्याला २० हजार तर बेस्ट पोझरला १० हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ व ८५ हून अधिक वजनी गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे रुपये ५०००, ४०००, ३०००, २००० व १५०० तसेच पदक, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मेन्स फिजिक स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांना अनुक्रमे रुपये १५ हजार, १० हजार आणि पाच हजारची तीन बक्षिसे देण्यात आली.
अंतिम निकाल -55 किलो- 1) कृष्णकुमार उडुपी, 2) गोविंद पुजार गदग, 3) सलमान खान शिमोगा, 4) विजय जे धारवाड, 5) अलोक कुमार दावणगिरी.
60 किलो- 1) शशिधर नाईक उडुपी, 2) गजानन गावडे बेळगाव, 3) रोनाल्ड डिसोजा दक्षिण कनडा, 4) नागराज चिकमंगळूर, 5) उदय मुरकुंबी बेळगाव.
65 किलो- 1) धीरज कुमार, 2)सोमशेखर कोरवी, 3) झाकीर हुल्लूर धारवाड, 4)अविनाश परीट बेळगाव, 5) मुरली एस कोलार.
70 किलो- 1) व्यंकटेश तशिलदार, 2)मंजुनाथ कोल्हापूर, 3) सुनील भातकांडे तिघे बेळगाव, 4) हजहर पाशा, 5) अर्जुन दावणगिरी.
75 किलो- 1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 2) वरूण दावणगिरी, 3) संपत कुमार शिमोगा, 4) वेणू गोपाल बेंगलोर, 5) शरण राज चिकमंगळूर.
80 किलो- 1) राहुल मेहरवाडे हरिहर, 2) गिरीश एम धारवाड, 3) प्रशांत खन्नुकर , 4) राहुल कलाल दोघे बेळगाव 5) श्रीहरि.
85 किलो- 1) किरण व्ही बी बेळगाव, 2) श्रीनिवास बेंगलोर, 3) अजर अहमद, 4) अलीस सिंगापुरी, 5) मोहम्मद मोमीन.
85 किलो वरील गट- 1) चरण कुमार उडुपी, 2) नजीर उल्ला खान, 3) मोहम्मद नूर मुल्ला चित्रदुर्ग, 4) गितेश दक्षिण कनडा, 5) अहमद हुसेन रायचूर.