Friday , November 6 2026
Breaking News

एस. एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त ३ दिवसांचा दुखवटा; उद्या सरकारी सुट्टी जाहीर

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त राज्यात ३ दिवसांचा दुखवटा व्यक्त करून उद्या सरकारी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे.

10 डिसेंबर ते 12 डिसेंबर असा शोक कालावधी जाहीर करण्यात आला असून दिवंगत ज्येष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तीन दिवस सर्व राज्य सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. सोमनहल्ली, मद्दूर येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *