बेळगाव : महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या महिलांच्या हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या तारांगण , सुनील टेक्सटाईल व कलाश्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने खेळ पैठणीचा सन्मान नारीचा हा कार्यक्रम शनिवार दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता बेळगाव आतील नार्वेकर गल्ली येथील सुनील टेक्सटाईल या भव्य शोरूमच्या हॉलमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विविध खेळ आणि स्पर्धा आयोजित केलेले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कोणतेही महिला यात सहभागी होऊ शकते. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रथम क्रमांकास रुपये पाच हजार रुपये ची पैठणी हे बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकासही पैठणी दिली जाणार आहे. इतर स्पर्धेसाठी 16 बक्षिसे आहेत. स्पर्धेसाठी अंतिम निर्णय पंचांचा राहील.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी 9341411186 या व्हॉट्सअँप क्रमांकावर जयश्री दिवटे यांच्याकडे करावी असे आयोजकांनी कळवले आहे. स्पर्धेचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील व संजय साबळे करणार आहेत.
तसेच या वेळी तारांगण या संस्थेने समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा त्याच्या योगदानाबद्दल सन्मान केला आहे. यावेळी पत्रकारिता क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल बेळगाव लाइव्ह चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा सन्मान सुनील टेक्सटाइलचे संचालक सुनील कटारिया यांच्या हस्ते होणार आहे.