बेळगाव : बेळगाव उत्तरचे भाजपचे आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील राजकीय कार्यालयावर रात्री अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली.
त्यामुळे येथील घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगडफेक कोणी आणि कशामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही.
ज्या ठिकाणी आमदारांचे कार्यालय आहे ते ठिकाण शहरातील अतिसंवेदनशील भागांपैकी एक म्हणून ओळखले जाते. दगडफेकची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस, व्हॅनसह चोवीस तास याठिकाणी तैनात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta