बेळगाव : शहापूर येथील सिध्दार्थ बोर्डिंगमध्ये साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य परशुराम नंदिहळ्ळी यांनी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १९२४ च्या काँग्रेस अधिवेशनातील प्रसंग व गंगाधरराव देशपांडे व महात्मा गांधी यांचे संबंध, त्यांची राष्ट्रीयतेची भावना यावर भाष्य केले.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य सुरेन्द्र देसाई उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जैन पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्रा.भरमा कोलेकर उपस्थित होते.
प्रा. भरमा कोलेकर यांनी देशासाठी त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण आपण सतत केली पाहिजे. त्यांच्या विचारांचे अनुकरण करुन समाज परिवर्तनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपला देश, आपली संस्कृती, आपला इतिहास हा विस्मरणात गेला आहे, तो पुन्हा नव्याने आजच्या युवा पिढीसमोर मांडला पाहिजे. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंदाच्या या देशात पुन्हा एकदा भारतभूमीसाठी वैचारिक क्रांतीची गरज आहे. स्वसुखाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाल्याशिवाय हा भारत देश सदृढ होऊच शकत नाही. ज्योतिराव फुले, सावित्रिबाई फुले, अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचारच विश्वावर आलेल्या संकटावर मात करण्याची प्रेरणा देतील. प्रत्येकाला बळ देतील, असा आशावादही प्राध्यापक भरमा कोलेकर यांनी मांडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिध्दार्थ फ्री बोर्डिंगचे चेअरमन संतोष होंगल होते. स्वातंत्र्यसैनिक गंगाधरराव देशपांडे यांच्या जीवनातील काही प्रसंग संतोष होंगल यांनी मांडले.
हिरालाल चव्हाण, संजय चौगुले, शिवाजी पवार, रेणुकाबाई सूर्यवंशी, लक्ष्मीबाई कांबळे, काशीनाथ चिगूळकर, मायाप्पा पाटील, रुपाताई सावंत, कस्तुरी लोहार, लक्ष्मीताई चलवादी, कविता कांबळे, विजयकुमार अमरकोळ आदि मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
आभार प्रदर्शन सिध्दार्थ बोर्डिंगच्या संयोजिका पवित्रा हिरेमठ यांनी केले.