
बेळगाव : वर्षअखेरीच्या खरेदीसाठी संपूर्ण देशाच्या विविध भागात उत्तम अशा वस्तूंचे प्रदर्शन यशस्वी केलेल्या न्यू इंडियन क्राफ्ट प्रदर्शनाची (एक्स्पोची) आता बेळगावात सुरुवात झाली आहे. सदाशिवनगर लक्ष्मी काँम्प्लेक्स नजीक सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी एक्स्पोचा शुभारंभ झाला असून बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या उपस्थितीत बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सदर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रदर्शन संगीता हँडलूम अँड हथकरघा वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
तत्पूर्वी यश कम्युनिकेशनचे संचालक तथा प्रदर्शनाचे आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन आमदार आसिफ (राजू) सेठ यांचे स्वागत केले. यानंतर आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी आशुतोष शर्मा, असलम मन्सूरी, प्रकाश कालकुंद्रीकर, मैनुद्दीन गुलाब खान, अश्फाक मुल्ला यांच्यासह अन्य उपस्थित होते.
उद्घाटनानंतर बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी सदर प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. तसेच वैयक्तिक आणि घरगुती वापराच्या विविध उत्तम अशा वस्तूंच्या प्रदर्शनाला भेट देऊन बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तर आयोजक प्रकाश कालकुंद्रीकर यांनी संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी अशा प्रकारचे हे प्रदर्शन ४० दिवस चालणार असून प्रदर्शनात प्रवेश व पार्किंगची मोफत सोय आहे. हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी भरविलेले १०० किलोचे पुस्तक प्रदर्शन हे या एक्स्पोचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या प्रदर्शनात देशभरातील १०० हून अधिक स्टाॅलधारकांनी भाग घेतला आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उडीसा, काश्मीर, शिमला, पंजाब, आसाम, अरुणाचल, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथील हस्तकला कारागिरांनी स्वत: हातांनी बनविलेल्या वस्तू या हस्तकला प्रदर्शनात अत्यंत माफक दरात उपलब्ध होत आहेत.
हँडमेड गिफ्ट्स, हँडमेड प्रोडक्टस, ज्वेलरी, टेराकोटा होम डेकोर, खुर्जा क्राॅकरी, डिजाईनर क्लोथ, वाराणसी साड़ी, कोलकाता, आसामी क्लोथ, लखनवी चिकनकारी ड्रेस मटेरियल, टाॅप्स प्लाझो, तेलंगणा टाॅवेल, लुंगी, जयपूरी नाईटी, पंजाबी व राजस्थानी चप्पल, बदोही कारपेट, पायपोस, हर्बल प्रोडक्ट्स, पानीपत सोफा कव्हर, होम फर्निशिंगकुशन कव्हर, बेड कव्हर, बुक्स, काश्मीरी शाल व सूट, खादी शर्टस, खादी हॅन्डलुम, गुजराती पर्स, किचन वेयर, सहारनपुर फर्निचर, फॅन्सी कुशन सोफासेट, राजस्थानी लोणचे, लाखेच्या बांगड्या, टी शर्ट, मुलांची खेळणी, खेकडा पिलकवा बेडशीट, लेदर आयटम, वुडन कार्विंग, मेटल क्राफ्ट, लेडीज कुर्ती, गाऊन, क्राॅकरी, बरण्या, आयुर्वेदिक उत्पादने, राजस्थानी चुरण, साॅफ्ट खेळणी, चन्नपटणा खेळणी, सौंदर्य प्रसाधने, गृह सजावटीसाठीचे विविध साहित्य, हैद्राबादी बँगल्स, मोती, खवय्यांसाठी मसाले, लोणचे, पापड, चटण्या, विंडोज डोअर कर्टन्स, लेडीज गाऊन, मोबाईल कव्हर, किचनवेअर गृहपयोगी वस्तू, शिवाय मैसूर हेअर ऑईल तिरुपुर टी-शर्ट, पायजमा, ट्रॅक सूटच्या शेकडो व्हरायटीज अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta