माजी महापौर मालोजीराव अष्टेकर: नवहिंद दिनदर्शिकेचे प्रकाशन
बेळगांव : नवहिंद सोसायटी स्थापनेपासून लोककल्याणकारी शैक्षणिक, क्रीडा आणि सहाकार क्षेत्रात मोठे यश पादाक्रांत केले असून समाजाने संस्थेच्या उपक्रमाला पाठबळ द्यावे असे आवाहन माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी केले. नवहिंद दिनदर्शिका 2025 च्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रकाश अष्टेकर होते.
सर्वसामान्य जनतेला वेळेत पतपुरवठा करुन त्यांचे जीवनमान उचंवूण राष्ट्र उभारणीचे काम करणारी आणि सहकारामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी संस्था म्हणजे नवहिंद सोसायटी असे गौरवोदगार साहित्यीक गुणवंत पाटील यांनी या प्रसंगी काढले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक व्हा. चेअरमन अनिल हुंदरे यांनी केले. नवहिंद क्रीडा केंद्राचे सेक्रेटरी आनंद पाटील यांनी ईशस्तवन सादर केले. संचालक मंडळाच्या वतीने पाहुण्यांना फुलार्पण करण्यात आले.
मालोजीराव अष्टेकर, गुणवंत पाटील, प्रकाश अष्टेकर , अनिल हुंदरे, सी. बी. पाटील, उदय जाधव, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, नारायण जाधव, माधुरी पाटील, निता जाधव यांच्या हस्ते “नवहिंद दिनदर्शिके”चे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षिय भाषणात चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी संस्थेच्या कार्यचा आढावा घेतला.
याप्रसंगी महेश जुवेकर, दत्ता उघाडे, दशरथ पाटील, वाय. एन. पाटील, पी. ए. पाटील, पी. एच. पाटील, आर वाय ठोंबरे, वाय. सी. गोरल, वाय. पी. देसूरकर, सुरेश पाटील, परशराम कंग्राळकर, पंकज जाधव, प्र्मोद जाधव, अनिल घाडी, संतोष अष्टेकर, जनरल मॅनेजर एन,. डी. वेर्णेकर, वसूली विभाग प्रमुख जे. एस. नांदूरकर, एओ इन्चार्ज विवेक मोहिते, शाखाधिकारी मदन पाटील, दिनेश पाटील, संदिप बामणे, सोमेश चौगुले, सागर जाधव, रमाकांत देसाई, महातेंश अलगुंडी, निलेश नाईक, संगिता कणबरकर, राहूल पाटील, वर्षा बिर्जे, विजया माळगे, मंजूळा वड्डीण्णावर, रश्मी बडवे आदि उपस्थित होते.
संचालक उदय जाधव यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.