
बेळगाव : महाराष्ट्रात सेवा बजावणाऱ्या कर्नाटकातील प्राथमिक शिक्षकांच्या ‘८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच’ बेळगावतर्फे आयोजित राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. तिसरी ते पाचवी (पहिला गट) व सहावी ते सातवी (दुसरा गट) अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेत १०५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
हिंडलगा हायस्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवी तरळे होते. तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, पत्रकार बी. बी. देसाई, डी. बी. पाटील, प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
मंचचे स्पर्धा विभाग प्रमुख बबन पेडणेकर यांच्या प्रास्ताविकानंतर संघटनेचे अध्यक्ष दशरथ सुर्यवंशी यांनी स्वागत केले. बी. बी. देसाई, डी. बी. पाटील, श्रीकांत शिंदे, बाळु प्रधान, संजय अष्टेकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शोभा देसाई यांनी सरस्वती पूजन केल्यानंतर आर. एम. चौगुले यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले.
बी. बी. देसाई यांनी, ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंचने सीमा भागात मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सीआरपी परशराम पन्हाळकर यांचेही यावेळी भाषण झाले.
ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. रेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, मारूती मिलके यांनी आभार मानले. वसंत चांदीलकर, अरुणा पावशे, सीआरपी सतीश पाटील, सुवर्णा रेडेकर आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. हिंडलगा, येळ्ळूर, खानापूर अशा तीन केंद्रावर परीक्षा घेण्यात आल्या.
हिंडलगा केंद्रातील विजेते स्पर्धक असे –
तिसरी ते पाचवी गट – विघ्नेश पाटील, कुद्रेमणी (प्रथम), हेमांगी हराडे – जाफरवाडी (द्वितीय), अराध्या पावशे – उचगाव (तृतीय), निहार हराडे – जाफरवाडी (यौथा), सुबदा बिर्जे – बालिका आदर्श (पाचवा क्रमांक), प्रणाली हुंद्रे – अलतगे (सहावा क्रमांक), अनन्या पाटील – मराठी विद्यानिकेतन – (सातवा क्रमांक), प्रिन्स धामणेकर – बाळंगमट्टी (आठवा क्रमांक), रसिका कित्तूर – कल्लेहोळ (नववा क्रमांक), वृंदा भांदुर्गे – मराठी विद्यानिकेतन (दहावा क्रमांक)
सहावी ते सातवी गट – साईराज गुरव – मराठी विद्यानिकेतन (प्रथम), श्रावणी पाटील – मराठी विद्यानिकेतन (द्वितीय), श्रृषीकेश महागावकर – कॅन्टोन्मेंट बोर्ड (तृतीय), तृप्ती भगत – मराठी विद्यानिकेतन (चौथा क्रमांक), आर्या देसाई (पाचवा क्रमांक), सृजन पाटील – मराठी विद्यानिकेतन (सहावा क्रमांक), नम्रता गिरियाळकर – मराठी विद्यानिकेतन – (सातवा क्रमांक), संचिता पाटील (आठवा क्रमांक), अथर्व पाटील (नववा क्रमांक), श्रावणी पाटील व दीपा पाटील (दहावा क्रमांक)
Belgaum Varta Belgaum Varta