बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून मसूर आणि वाटाणा ही पिकं खराब हवामानाने मोठ्या प्रमाणात कोमेजून जमीदोस्त झाला असल्यामुळे शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
गेल्या चार दिवसापासूनच्या ढगाळ वातावरणामुळे हवेत उष्णता निर्माण होऊन पिकांना पोषक वातावरण नसल्याने मर रोगाने शिल्लक असलेली पीकेही आता किडिच्या मोठ्या प्रादुर्भावाने जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
शेतकर्यांकडून कृषी खाते व कृषी दुकानदार जी सांगतील ती औषध फवारणी करुन झाली तरीही कांही हाताला लागलेले नाही. शेवटी खराब हवामानामुळे औषधांचा पीकांवर कोणताच परिणाम झाला नसल्याने शेतकरी चितांतूर झाला आहे. कारण अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान झाल्यामुळे एक महिना उशिरा पेरण्या झाल्या आहेत.
तालुक्याच्या दक्षिणेकडील भागात बासमतीसह मसूर, काळा वाटाणा हि धान्य प्रसिद्ध आहेत. तथापी आता मसूर आणि वाटाणा पिकं खराब हवामानाने मोठ्या प्रमाणात कोमेजून ती जमीदोस्त झाला असल्याने शेतकरी मोठ्या संकटात अडकला आहे. सरकारची साथ तर नाहिच पण आता हवामानाची देखील साथ नसल्यामुळे कशावर आशा ठेवायची असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta